वडिगोद्री : पिक अप उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलिला पाठीमागून धडकल्याने वाहनचालक जागीच ठार झाला. ही घटना , छत्रपती संभाजीनगर ते बीड राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपावर उड्डाणपूलावर आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
हैदराबाद तेलंगणा येथुन छत्रपती संभाजीनगर येथुन कंपनीचं केमिकल घेऊन,शहागडकडुन वडिगोद्रीकडे पिकअप क्रमांक एम एच 17,बी वाय,4955 हे वाहन समोर चाललेल्या उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलिला पाठीमागून धडकले. यामध्ये किरण अशोक सोनवणे, रा बोरगव्हाण ता. नेवासा जिल्हा अहील्यानगर, याचा जागीच मृत्यू झाला. पिकअपची जोराची ट्रॅक्टरच्या ट्राॅलिला बसल्याने वाहनाचा समोरचा भाग आत चेपल्याने, मृत चालकाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे प्रयत्न केले परंतु अपयश आल्याने. नंतर पिकअपचा चेपलेला भाग दोरीच्या सहाय्याने ओढून काढून चालकाला बाहेर काढण्यात यश आले..
अपघातातील मयत शहागड येथे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आल्याने , येथील आरोग्य केंद्राचा पदभार असल्याने तिथे शवविच्छेदनासाठी अडचण झाले नाही. नंतर शवविच्छेदनासाठी वडिगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असल्याचे गोंदी पोलिसांनी माहिती दिली. अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाल्याने बऱ्याच वेळ ट्राफीक खोळंबलेली पहायला मिळाली.