जालना

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे फडणवीसांचं षडयंत्र : मनोज जरंगे पाटील

Shambhuraj Pachindre

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा पुन्हा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एका कार्यक्रमासाठी मनोज जरांगे जालन्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. (Manoj Jarange Patil)

नांदेडमध्ये भाजपा नेते अशोक चव्हाण यांची गाडी अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळं सरकारनं नवीन नियम काढला आहे का? घोषणा दिल्या की 353 कलमानुसार गुन्हा दाखल करणार? तुम्हाला गाडीच्या खाली उतरवून मराठा आंदोलकांनी मारहाण केली का? असं प्रश्न जरांगे यांनी फडणवीस यांना विचारलाय. हे गृहमंत्र्यांचं षडयंत्र असून याला आता पुढं चालून जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा ही त्यांनी दिला.

नांदेड येथील मराठा आंदोलकांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचं जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा भरत आलेला खेळ आहे. असा निशाणा जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर साधला.  मंगेश चिवटे यांच्या मध्यामतून त्यांनी परत नवीन काही तरी सुरू केलं असल्याचं जरांगे म्हटले. मला जरा स्पष्ट माहिती मिळाली की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मोकळं होणार आहे. आणि ती गोष्ट सर्वांसाठीच शॉकिंग आणणार असल्याचं जरांगे म्हणाले. (Manoj Jarange Patil)

मराठ्यांच्या विरोधातले हे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी रचले आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या घोषणा देणे पाप आहे का, जरांगे यांचा फडणवीस यांना सवाल विचारत ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दुसरी चाल रचलिय आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार देलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत मी कोणताही उमेदवार दिलेला नसून माझा कुणालाही पाठिंबा नाही. आंदोलनाचा कुणी गैरफायदा घेवू नये. तसेच माझा फोटोही कुणी वापरु नये असे जरांगे यांनी यावेळी सांगितले. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा फायदा घेऊ नका, आमचे फोटो ही लावू नका आणि आमचे नाव ही वापरू नका, असा जरांगे यांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सल्ला दिला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT