Ambad News : पाणीपुरवठ्यात अनियमितता आमदार नारायण कुचेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर file photo
जालना

Ambad News : पाणीपुरवठ्यात अनियमितता आमदार नारायण कुचेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

दुष्काळी आढावा बैठक, सरपंच नसलेल्या गावात माजी सरपंचांना अधिकार

पुढारी वृत्तसेवा

Irregularities in water supply: MLA Narayan Kuche issues instructions to officials

अंबड, पुढारी वृत्तसेवाः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टँकरच्या पाणीपुरवठ्यातील अनियमितता, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि प्रशासकीय हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. नारायण कुचे यांनी अंबड येथे दुष्काळ आढावा बैठकीत दिला. यावेळी सरपंच नसलेल्या गावात माजी सरपंचाना आर्थिक बाबी वगळता काही अधिकार देण्यात येतील असेही ते म्हणाले.

येथील मत्स्योदरी देवी मंदिर सभागृहात आयोजित दुष्काळ व टंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठकीत आमदार कुचे बोलत होते. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना प्रशासकीय अनागोंदी आणि अनेक त्रुटी समोर आल्याने आ. कुचेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, प्रदीप पवार, सुनीलराव खांडेकर, नगरसेवक केदार कुलकर्णी, गोवर्धन भोरे, सुहास सोडाणी, सौरभ कुलकर्णी, गंगाधर वराडे, अमोल वराडे, डॉ. राहुल डोंगरे, राहुल शहाणे, नगरसेवक शेख फेरोज, दत्ता जाधव आदी उपस्थित होते. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अनियमितता, टँकरमधील पाण्याचे प्रमाण न तपासणे, पाण्याची गुणवत्ता तपासणी न करणे आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या.

टँकरच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी गावागावांत महिलांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याची बाबही समोर आली. यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना जाब विचारत टंचाई विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती व टंचाई विभागाचा कारभार तातडीने सुधारण्याच्या सूचना आमदार कुचे यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT