Industries Minister Uday Sawant met Deepak Borhade
परतूर, पुढारी वृत्तसेवा जालना, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजासाठी संवैधानिक एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या दीपक बोहाडे यांच्या उपोषण स्थळी शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सावंत यांनी भेट घेउन चर्चा केली. यावेळी आ. अर्जुनराव खोतकर हे सुध्दा त्यांच्या सोतब होते.
तत्पूर्वी गुरुवारी सांगोल्याचे आ.डॉ. बाबासाहेव देशमुख, व माळशिरसचे आ. उत्तमराव जानकर यांनीही भेट देऊन दीपक बो-हाडे यांच्याशी संवाद साधला. गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन प्रकृतीबाबत विचारणा केली तसेच उपोषण स्थळी असलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेतला.
धनगर समाजासाठी संवैधानिक एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण स्थळी शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, उपोषणाबाबत मी आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे.
तत्पूर्वी गुरुवारी (ता. २५) सांगोल्याचे आ.डॉ. बाबासाहेब देशमुख व माळशिरसचे आ. उत्तमराव जानकर यांनी भेट देऊन दीपक बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनीही उपोषणस्-थळी भेट देऊन प्रकृतीबाबत विचारणा केली तसेच उपोषण स्थळी असलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेतला.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासून गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले दीपक बो-हाडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना सलाईन लावण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची नियमित तपासणी केली जात आहे. आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीसुद्धा दीपक बोहाडे यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
उपोषण स्थळी दररोज राज्यभरातील धनगर समाज बांधव स्वखचनि वाहने करून दाखल होत आहेत. आरक्षणाच्या लढाईत यथाशक्ती समाजबांधव मदत करत आहेत. धनगर समाजबांधवांची उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान शुक्रवारी (ता. २६) जालना जिल्हाधिकारी कार्यालयासह आठही तहसील कार्यालयांसमोर धनगर समाजबांधवांच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
धनगर आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा शुक्रवारी दहावा दिवस होता. छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी शुक्रवारी आंदोलन स्थळी भेट दिली. धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. पाठिंब्याचे पत्र उपोषण करते दीपक बोडे यांनी स्वीकारले.