Sugar factory : समृद्धी, घृष्णेश्वरकडून प्रतिटन १०० रुपयांचा वाढीव हप्ता file photo
जालना

Sugar factory : समृद्धी, घृष्णेश्वरकडून प्रतिटन १०० रुपयांचा वाढीव हप्ता

शेतकऱ्यांना दिलासा, कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Increased installment of ₹100 per tonne from Samruddhi and Grishneshwar

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : बैलपोळ्यानिमित्त 'समृद्धी व घृष्णेश्वर साखर कारखान्या'च्या वतीने शेतकरी बांधवांच्या खात्यात प्रतिमेट्रिक टन १०० रुपयांचा वाढीव हप्ता वर्ग करण्यात आला आहे. तसेच आगामी दिवाळी सणाला गाळप हंगाम २०२५-२६ च्या अंतिम हप्त्याची घोषणा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयानंतर करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी दिली आहे.

गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये समृद्धी व घृष्णेश्वर साखर कारखान्यात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसासाठी पहिला हप्ता प्रतिमेट्रिक टन २,८०० रुपये याप्रमाणे देण्यात आला. त्यानंतर बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन १०० रुपयांचा वाढीव हप्ता देण्याचा निर्णय कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने घेतला.

सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील, व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी तसेच सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. गाळप हंगाम २०२५-२६ मधील उसाचा हा अंतिम भाव नसून, शेतकऱ्यांच्या उसाचा अंतिम भाव दिवाळी सणाला जाहीर करण्यात येणार असल्याचे सतीश घाटगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे-

बैलपोळा सणासाठी शेतकऱ्यांना साखरेचे वाटप

बैलपोळा सणानिमित्त कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना अल्पदरात साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. ८ रोजीपासून साखर वाटप सुरू होणार आहे. सर्व सभासद शेतकऱ्यांनी सवलतीच्या दरातील साखरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकी विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT