पीककर्ज Crop Loan (Pudhari Photo)
जालना

Crop Loan : पीक कर्ज मर्यादेत वाढ शेतकऱ्यांना होणार लाभ

२०२६-२७ साठी पीक कर्ज धोरण जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Increase in Crop Loan Limits to Benefit Farmers

जालना, पुढारी वृत्तसेवाः शेतकऱ्यांसाठी २०२६-२७हंगामाचे नवे पीक कर्ज धोरण निश्चित करण्यात आले असून, उत्पादनखर्चाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कर्जमयदित लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

पीक कर्ज वाढीचा निर्णय राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्याच्या बैठकीत घेण्यात आला असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना तात्काळ अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगदी पिकांना सर्वाधिक दिलासा देण्यात आला असुन अन्नधान्य पिकांसाठीही कर्जमयदित वाढ करण्यात आली आहे.

नवीन पीक कर्ज धोरणात मका, ज्वारी, बाजरीसाठी ३८ ते ६५ हजार, तूर, मूग, उडीद पिकांसाठी २७ ते ६५ हजार रुपये कर्ज देण्यात येणार आहेत. यामुळे पारंपरिक पिकांनाही बळ मिळणार आहे. भाजीपाला व मसाला पिकांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. कांदा-टोमॅटो ९० हजार ते १ लाख २५ हजार, हळद १ लाख ४० ते १ लाख ८० हजार, आले १ लाख १० ते १ लाख ६० हजार रुपये आहे.

फळपिकात वाढ

फळबागांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ आंबा, केळी, संत्रा-मोसंबी यांसारख्या फळबागांसाठी १.२५ लाख ते २.५० लाख रुपये दरम्यान कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. द्राक्षे व डाळिंब यांसारख्या उच्च मूल्य फळपिकांमध्ये वाढ अधिक ठळक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT