पालकमंत्र्यांच्या हस्ते चौपाटी सुशोभीकरणाचे लोकार्पण file photo
जालना

Jalna News : पालकमंत्र्यांच्या हस्ते चौपाटी सुशोभीकरणाचे लोकार्पण

जालना शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन चौपाटीचे सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Inauguration of the Chaupati Beautification Project by the Guardian Minister

जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते जालना शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन चौपाटीचे सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी नागरिकांसाठी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल्स आणि बैठकीची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह मान्यवरांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT