In the Pimpalgaon Renukai area, farmers are showing a preference for bullock pairs.
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : सध्या आधुनिक युगामध्ये ट्रॅक्टर विविध मशिनरीच्या साह्याने शेतीकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आह. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात काही शेतकरी बैलजोडी वापर करत आहे. वाढत्या महागाईत बैलजोडी स्वस्त पडत असल्याने शेतकरी यांचे म्हणने आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात जून महिन्यामध्ये मात्र अल्प पाऊस पडल्याने शेतकरी निराश झाले होते. परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने विहिरींना व नाल्यांना मुबलक पाणी आल्यामुळे शेतकऱ्याने यावर्षी गहू, मका, हरभरा आधी पिकांची मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कमी दिवसात अल्प पाण्यामध्ये येणारे उत्पन्न म्हणजे हरभरा सध्या थंडीचे वातावरण पोषक असल्याने हरभऱ्यांना व गव्हांना पोषक होत आहे. यामुळे यावर्षी नक्कीच शेतकऱ्यांना उत्पन्नात भरघोस वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
ट्रॅक्टरसह अत्याधुनिक साहित्यांचा वापर करत शेतकरी शेती करत आहे. परंतु यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. यामुळे अल्पभूधारक व इतर शेतकरी आता बैलजोडीला पसंती देत असल्याचे दिसून पिंपळगाव रेणुकाई परिसरात दिसून येत आहे. पुन्हा शेतीत बैलांचा वापर दिसत आहे.
शेतीसाठी कितीही मशनरी उपलब्ध झाल्या आहे. परंतु शेतीसाठी बैलजोडीशिवाय पर्याय नाही. कमी खर्चात आणि वेळेवर शेती करता येते.संदीप गावंडे, शेतकरी