वाळू घाटातून होतोय अवैध उपसा file photo
जालना

वाळू घाटातून होतोय अवैध उपसा

तालुका महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष, कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Illegal sand extraction is taking place at the sand ghats

मंठा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा नदी पात्रात वाळू माफियांची मग्रुरी वाढली असून वाळू घाटातून अविद्य वाळू उपसा व उत्खनन सर्राशपणे सुरू आहे. तालुक्यातील महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील पूर्णा दीपात्रात सध्या वाळू उपशावरून मोठे रणकंदन माजले आहे. तालुक्यातील १२ पैकी ११ वाळू घाटांचे लिलाव झाले असून, त्यापैकी ७ घाटांतून अधिकृत उपसा सुरू आहे. मात्र, उर्वरित ४ घाट अद्याप ठेकेदारांच्या ताब्यात दिले नसतानाही तिथे अवैध उत्खननाचा पूर आला आहे. विशेष म्हणजे, महसूल प्रशासनाच्या वतीने अर्थपूर्ण' दुर्लक्ष होत आहे.

पूर्णा नदीकाठच्या खोरवड, देवठाणा, उस्वद, कानडी, हनवतखेडा, लिबखेडा, पूर्णा पाटी, सासखेडा, इंचा, टाकळखोपा, दधा, किर्ला, वाघाळा, पोखरी-केंधळे, भुवन आणि वझर सरकटे या गावांमधून दररोज शेकडो ब्रास वाळूची चोरी होत आहे. स्थानिक वाहनधारक महसूल व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. या महसूल बुडवणाऱ्या यंत्रणेवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील देवठाणा-उस्वद आणि भुवन या घाटांवरून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नियमबाह्य उत्खनन केल्याचा ठपका असतानाही, महसूल विभागाने एका कन्स्ट्रक्शन कंपनीला कानडी-उस्वद हा ८ हजार ४८१ ब्रासचा घाट ताबा दिलाच कसा? एवढेच नव्हे तर, त्यांचे नातेवाईकांना टाकळखोपा-किर्ला घाटाचा ताबा १७ मार्च रोजी देण्यात आला आहे. या मेहेरनजरमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

बाऊन्सरचा वापर

देवठाणा-उस्वद घाटावर ठेकेदार आणि स्थानिक वाहनधारकांमध्ये गुन्हे दाखल होण्यापर्यंत वाद विकोपाला गेले आहेत. परिस्थिती इतकी चिघळली आहे की, चक्क ४ महिला बाऊन्सर या घाटावर तैनात कराव्या लागल्या होत्या. तरीही वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. सध्या हा घाट बंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT