Crime News : पांढऱ्या गोणीत लपवून देशी दारूची अवैध विक्री File Photo
जालना

Crime News : पांढऱ्या गोणीत लपवून देशी दारूची अवैध विक्री

एका ५५ वर्षीय व्यक्तीला अंबड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Illegal Sale of Country Liquor Concealed in a White Sack

जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील झिरपी फाटा परिसरातील एका मोकळ्या जागेत छुप्या पद्धतीने देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीला अंबड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

शुक्रवार (दि. २२) रोजी अंबड पोलीस ठाण्यातील सोनकपिंपळगाव बीटचे बीट अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) विलास निवृत्ती वाघमारे हे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार डोईफोडे आणि फलटणकर यांच्यासह आलमगाव बीट हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत होते.

संध्याकाळी ठीक ६ वाजण्याच्या सुमारास झिरपी फाट्यावरील मोकळ्या जागेत छापा टाकला असता, तिथे एक व्यक्ती देशी दारूची चोरटी विक्री करताना रंगेहात पोलिसांच्या हाती लागला. त्याचे नाव शंकर जयराम राठोड (५५, रा. सोनकपिंपळगाव, ता. अंबड) असे आहे. त्याची झाडाझडती घेतली असता एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये देशी दारू भिंगरी संत्रा लेबल असलेल्या १८० एमएलच्या एकूण २२ काचेच्या सीलबंद बाटल्या (किंमत प्रति बाटली ८० रुपये) असा एकूण १,७६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सफौ विलास वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध देशीदारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दण- ाणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT