वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथून जालन्याकडे विटा घेऊन जाणाऱ्या हायवा ट्रकला डाव्या कालव्याजवळ अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने काही वेळात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.यामुळे काहीकाळ वडीगोद्री-जालना महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.
शहागड येथून वीट उत्पादक ऋषीकेश वसंत सापटे याचा हायवा जालन्याकडे विटा घेऊन जात होता.यावेळी डाव्या कालव्याजवळ या हायवा (क्र.एमएच12-9016) ला अचानक भीषण आग लागली. यामुळे अवघ्या काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच हायवा चालकासह सोबत असलेल्या मजुरांनी हायवामधुन उड्या मारुन जिव वाचवला.
अवघ्या काही वेळेत हायवा रस्त्याच्या मध्यभागी जळत असल्याने वडीगोद्री-जालना महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले. घटनास्थळी आग विझविण्यासाठी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. मात्र हायवा विझविण्यात अपयश आले.हायवाला कोणत्या कारणामुळे आग लागली हे समजु शकले नाही. घटनास्थळी गोंदी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.आग विझवण्यासाठी समर्थ कारखाण्याच्या अग्नीशामक दलाचा बंब बोलविण्यात आला होता.
दरम्यान आग विझविण्याकरीता नजीकच्या पेट्रोलपंपावरुन आग विझविण्यासाठी अग्नीशामक यंत्राव्दारे प्रयत्न करण्यात आला.मात्र तो निष्फळ ठरला हायवाला आग लागल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांमधे घबराट निर्माण झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे यावेळी दिसुन आले.
भीतीचे वातावरण
शहागड येथुन विटा घेउन जालन्याकडे निघालेल्या हायवाला कोणत्या कारणामुळे आग लागली हे समजु शकले नाही. या आगीत 20 ते 25 लाख रुपयांचा हायवा जळुन खाक झाला. डाव्या कालव्याजवळ झालेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांमधे भीतीचे वातावरण दिसून आले.