Jalna Crime : पत्नीला ठार मारणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा  FIle Photo
जालना

Jalna Crime : पत्नीला ठार मारणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

ढासला येथे किशोर कचरू नावकर हा मयत पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

पुढारी वृत्तसेवा

Husband sentenced to life imprisonment for killing wife

जालना, पुढारी वृत्तसेवा बदनापूर तालुक्यातील ढासला येथे पत्नीचा खून करणाऱ्या किशोर कचरू नावकर यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

बदनापूर तालुक्यातील ढासला येथे किशोर कचरू नावकर हा मयत पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. १ ऑक्टोबर २०२४ रोजी कविता ही कंडारी खुर्द येथील माहेरा हून ढासला येथे जात असताना कंडारी ते मालेवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील गट क्रमांक ४०४ मधील शेतजमिनीजवळ तिचा डोक्यात दगड टाकून खुन करण्याची घटना घडली होती.

या प्रकरणी कारभारी लिंबाजी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विठ्ठल गणपत राठोड, पंच साक्षीदार, डॉ. प्रगीत व डॉ. संजय गोरे व इतर साक्षीदार तसेच तपासीक अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांनी आरोपी किशोर कचरू नांवकर, यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड अशोक डी. मते यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT