

Dhangar Samaj Reservation Deepak Borhade's health deteriorates
जालना, पुढारी वृत्तसेवा धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी दीपक बोहाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालवली आहे. डॉक्टराचे पथक त्यांची सातत्याने तपासणी करत आहे.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतून बांधव या उपोषण भेट देत आहे. शुक्रवारी (दि.१९) रोजी डॉक्टराच्या पथकाने उपो-षणकर्ते दीपक बो-हाडे यांची तपासणी केली असता. त्यांची शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावेळी दीपक बोहाडे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे १३ वंशज भूषणराजे होळकर यांनी भेट दिली.
आपला पाठिंबा जाहीर करत शासनाने उपोषणाची दखल घेऊन दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. कारण बोहर्हाड यांनी तब्येत खालवत चालली असल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळपासून विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी यांनी भेटी दिली आहे. भाजपचे जालना शहर महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, यांच्यासोबत भाजपचे राजेश राऊत, अशोक (अण्णा) पांगारकर, बद्रीनाथ पठाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, कॉग्रेसचे राजेंद्र राख, सत्संग मुंढे यांच्यासह आमदार नारायण कुचे यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन धनगर आरक्षणास पाठिंबा दिला आहे.
सत्तर वर्षांपासून धनगर समाजाला एका टायपिंग चुकीमुळे आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 'धनगड' ऐवजी 'धनगर' अशी दुरुस्ती करण्याची मागणी दीपक बोऱ्हाडे यांनी केले. आरक्षण जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.