Honoring the meritorious students of the Pudhari Talent Search Examination
शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवाः दैनिक 'पुढारी' व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेतील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील इयत्ता ५ वी व ८ वी मधील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पंचायत समिती येथे ध्वजारो हणानंतर सभापती संजय सूर्यवंशी व गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सुमारे एक महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. १२ मार्च रोजी पार पडलेल्या या परीक्षेस जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
निकालानुसार इयत्ता ५ वी गटात वेदांत दत्तात्रय माने (हिपळगाव), कार्तिकी भुजंग शिंदे (शिवपुर) व वेदिका ईश्वर पलमंटे (हिपळगाव) यांनी यश संपादन केले. तर इयत्ता ८ वी गटात कृष्णा राम बोइणे (डिगोळ), स्वाती रंगनाथ पालकर (यरोळ) व हरी भगवान सूर्यवंशी (तळेगाव) हे विद्यार्थी गुणवंत ठरले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयीची आवड व आत्मविश्वास वाढीस लागणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सहाय्यक गटविकास अधिकारी रविंद्र साचणे, मंजुर पटेल, प्रशासन अधिकारी चंद्रकांत कदम मुख्याध्यापक गुरुनाथ सिंदाळकर, शिक्षक संघटनेचे बालाजी पाटील, गायकवाड सुनील, कलुरे सुधीर, लोखंडे महादेव व आलुरे नंदकिशोर.. बीआरसी कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी शिक्षक पालक विद्यार्थी, पुढारी प्रतीनीधी दयानंद कुंभार उपस्थित होते