Hingoli news | औंढ्यात गट साधन केंद्राला भीषण आग; संकलित मूल्यमापन चाचणीचे १२ हजार पेपर जळून खाक

या परिस्थितीत विद्यार्थी वर्गाचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे
Hingoli news | औंढ्यात गट साधन केंद्राला भीषण आग; संकलित मूल्यमापन चाचणीचे १२ हजार पेपर जळून खाक
Published on
Updated on

औंढा नागनाथ: पंचायत समितीच्या गट साधन केंद्राला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये संकलित मूल्यमापन चाचणीचे तब्बल 12000 पेपर जळून खाक झाले असून बुधवारी (दि.८) रोजी हा प्रकार घडला.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पेपरची मागणी शिक्षणाधिकारी असावरी काळे यांनी नोंदवली आहे. तात्काळ पेपर उपलब्ध होणार असून विद्यार्थी वर्गाचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सहावीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे भाषा, गणित व इंग्रजी विषयाची ही परीक्षा असून दिनांक 11, 15, व 22,. एप्रिल परीक्षा होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडे जिल्ह्यांचा पेपरचा पुरवठा करण्यात आला होता.

हिंगोली जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून सात केंद्रावर रवाना केले होते तर उर्वरित सहा केंद्राचे पेपर गट साधन केंद्रामध्ये पाठवण्यासाठी शिल्लक होते. सकाळी गटसाधन केंद्रातून धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. कर्मचारी पांडुरंग सूर्यवंशी यांनी हा प्रकार गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौफिक यांना कळविला. गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे ,गटशिक्षणाधिकारी तौफीक, विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी करून औंढा नागनाथ पोलीसात कळवल्यावरून तात्काळ पो.नि.जी एस राहिरे व उप.नि. दत्ता कानगुले वसीम पठाण, शेख इकबाल, रविकांत हरकाळ यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.

आगीमध्ये तब्बल 12000 पेपर जळून खाक झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी तौफिक यांनी सांगितले .शॉर्ट सर्किट मुळे हि आग लागल्यामुळे माहिती घेण्यास सुरुवात केली. ही परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवली असून पेपर प्राप्त झाल्यावर ठरवून दिलेल्या तारखेला परीक्षा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. घटनास्थळी हिंगोलीवरून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी भेट देऊन पाहनी किती असता शॉर्टसर्किटमुळे सदरील आग लागली आहे. त्यामुळे कुठल्याही आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र येथे नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका कुशंका बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news