बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना; कामगारांना मोठा दिलासा file photo
जालना

बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना; कामगारांना मोठा दिलासा

जाफराबाद : मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार, औषधोपचारांची सुविधा दिली जाते

पुढारी वृत्तसेवा

Health Scheme for Construction Workers; Major Relief for Workers

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा:

बांधकाम कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी शासनाने सर्वसमावेशक आरोग्य योजना सुरू केली आहे. यामुळे कामगारांना परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळत आहे.

दरम्यान, या योजने अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत वैद्यकीय तपासणी, आवश्यक उपचार, तसेच औषधोपचारांची सुविधा दिली जाणार आहे. साध्या आजारांपासून ते गंभीर आजारांपर्यंत विविध प्रकारच्या उपचारांचा खर्च शासन उचलणार आहे. याशिवाय अपघातग्रस्त कामगारांना तात्काळ आर्थिक मदत, रुग्णालयात भरती खर्च, तसेच पुनर्वसनासाठीही सहाय्य दिले जाणार आहे.

कामगारांच्या कुटुंबीयांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून, पत्नी व मुलांच्या आरोग्य तपासण्या आणि उपचाराची सोय करण्यात आली आहे. विशेषतः महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये रक्त तपासणी, डोळे तपासणी, तसेच इतर आवश्यक चाचण्या मोफत केल्या जातील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी सोपी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळ-ोवेळी मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. कामगारांनी लाभ घ्यावा.

विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे

शासनाच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करून कामगारांना त्यांच्या कार्यस्थळाजवळच सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच कामगारांना आरोग्यविषयक जनजागृती करून सुरक्षित कामकाज पद्धती, पोषण आहाराचे महत्त्व आणि स्वच्छतेचे नियम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

एजंटमार्फत गरीब कामगारांची लूट होत आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. अन्यथा जाफराबाद तहसीलसमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
-निसार शहा, तालुका उपाध्यक्ष धडक युनियन जाफराबाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT