मोतीगव्हाण ग्रामपंचायत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची हॅट्रिक file photo
जालना

Jalna News : मोतीगव्हाण ग्रामपंचायत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची हॅट्रिक

युतीने सलग तिसऱ्या वेळेस विजय मिळवत विजयाचा झेंडा फडकवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Hat trick of Shiv Sena-NCP alliance in Motigavan Gram Panchayat

जालना, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील मोतीगव्हाण ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सलग तिसऱ्या वेळेस विजय मिळवत विजयाचा झेंडा फडकवला आहे.

निकाल पोटनिवडणुकीचा बुधवारी (ता.२९) रोजी जाहीर झाला. यात युतीचे सर्जेराव पटेकर यांनी विजय संपादन केला. निकाल जाहीर होताच युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला या निकालामुळे गावात युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

आ. अर्जुनराव खोतकर यांच्यासह माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, राष्ट्रवादीचे युवा नेते धैर्यशील चव्हाण यांनी विजयी उमेदवारासह युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सरपंच फकीरा मोहिते, माजी उपसरपंच भगवानराव मोहिते, युवा सेना लोकसभा अध्यक्ष गणेश मोहिते, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष उमेश मोहिते, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मोहिते, नानाभाऊ मोहिते, भरतराव मोहिते, लक्ष्मण मोहिते, परसराम मोहिते, विशाल पटेकर, तुकाराम तिडके, बाबासाहेब पटेकर, प्रताप पटेकर, प्रवीण मोहिते, मधुकर मोहिते, गणेश मोहिते, नंदकिशोर मोहिते, गजानन मोहिते, गजानन मोहिते, दीपक पटेकर, दिलीप लाखे आदींची उपस्थिती होती. दरम्यान गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करून ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार सरपंच सर्जेराव पटेकर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT