सराईत गुन्हेगार गोफणे तीन जिल्ह्यांतून हद्दपार File Photo
जालना

सराईत गुन्हेगार गोफणे तीन जिल्ह्यांतून हद्दपार

सहा महिन्यांसाठी हद्दपारीची प्रशासनाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Hardened Criminal Gophane Externed from Three Districts

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संदीप गोपीनाथ गोफणे (रा आंबेगाव ता. जाफराबाद) याला उपविभागीय दंडाधिकारी बी. सरवनन यांनी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

संदीप गोफणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर गर्दी जमवून मारहाण करणे, आणि जिवे मारण्याच्या धमक्या देणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक जालना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार त्याच्यावर हद्दप-ारीची कारवाई करण्यात आली आहे.

संदीप गोपीनाथ गोफणे याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक आणि पीडित व्यक्ती त्याच्याविरुद्ध जाहीरपणे साक्ष देण्यास घाबरत होते. त्याच्या कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता धोक्यात आली होती. आरोपीने स्वतःचा बचाव करताना हे गुन्हे खोटे असल्याचे म्हटले होते, तरी प्रशासनाने वस्तुस्थिती आणि गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा बचाव फेटाळून लावला.

आरोपीला संपूर्ण जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपारी ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असेल. या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय वरील तीन जिल्ह्यांत प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमधील भीतीचे वातावरण दर करण्यासाठी ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पोलिस प्रशासनाच्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांमधे दहशतीचे वातावरण आहे.

चार महिन्यांत सहाजण हद्दपार

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील अवैध वाळूमाफिया व गुन्हेगारी पार्श्वभूमी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील तब्बल सहा जणांना आतापर्यंत हद्दपार करण्यात केले आहे. त्यामध्ये कृष्णा जिवनराव साबळे (रा. लिंगेवाडी ता. भोकरदन), शेख अजिम शेख दरबार (रा. पळसखेड मुर्तड ता. भोकरदन), संदीप गोपीनाथ गोफणे (रा. आंबेगाव, ता. जाफराबाद), किरण कैलास पंडित (रा. मेरखेडा, ता. भोकरदन), सतीश नारायण मोरे (रा. नांजा, ता. भोकरदन) व संदीप गोपीनाथ गोफणे (रा आंबेगाव, ता. जाफराबाद) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT