Half of July is over, five projects are dry
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात मे महिन्यात बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पात काही अंशी पाणीसाठ्याची भर पडली. मात्र, जून आणि अर्घा जुलै सरला तरी काही ठिकाणी अद्यापी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात सध्या ११.४३ टक्के इतका उपयुक्त पाणी साठा असून, ५ प्रकल्प कोरडे तर तब्बल २९ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.
जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५४ लघु प्रकल्प आहे. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी २३४.८८ दलघमी इतकी आहे. सध्या १७ जुलैपर्यंत कल्याण मध्यम प्रकल्प, कल्याण गिरीजा, अप्पर दुधना, जुई मध्यम प्रकल्प, धामणा, जुई आणि गलाटी या सात मध्यम प्रकल्पांत ६.१५ दलघमी साठा उपलब्ध आहे. तर मागच्या आठवड्यात हा साठा ६.५१ इतका होता.
आजपर्यंत ५७ लघु प्रकल्पांत १८.३९ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. तर ५७ पैकी २९ लघु प्रकल्प जोत्याखाली गेल्या आहेत.
एकंदरी जालना जिल्ह्यात ३० प्रकल्प जोत्याखाली असल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे. धामणा प्रकल्पात ०.९१, टक्के, कल्याण गिरजा प्रकल्पामध्ये १.५० टक्के, अप्पर दुधना प्रकल्प २.१३ टक्के, जुई मध्यम प्रकल्प ०.८६ टक्के, धामणा मध्यम प्रकल्प ०.९१ टक्के, जीवरेखा मध्यम प्रकल्पात ०.५३ तर अंबड तालुक्यातील गल्लाटी माध्यम प्रकल्पात ०.२३ टक्के इतका उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे. दरम्यान, गुरुवारी घनसावंगीसह इतर ठिकाणी झालेल्या पावसामुळे या प्रकल्पातील पाणीपातळीत काहीअंशी वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रकल्प. जलसाठा (टक्केवारीत)
अप्पर दुधना (ता. बदनापूर) १७.५६
कल्याण गिरिजा (ता. जालना) १५.५१
कल्याण मध्यम (ता. जालना) 0.00
जुई मध्यम (ता. भोकरदन) १४.३०
धामना मध्यम (ता. भोकरदन) १५.७१
जीवरेखा मध्यम (ता. जाफराबाद ८.६१
गल्हाटी मध्यम (ता. अंबड) १.६३
एकूण ९.३५ टक्के