Jalna News : वाळूमाफियांवर गोंदी पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी आपेगाव येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई केली.
Jalna News
Jalna News : वाळूमाफियांवर गोंदी पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्तFile Photo
Published on
Updated on

Gondi police take action against sand mafia; Property worth Rs 35 lakh seized

जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी आपेगाव येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करून पोलिसांनी पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Jalna News
Jalna News : मका पिकावर वाढला अळीचा प्रादुर्भाव, साडेतीनशे हेक्टरवरील मका पीक धोक्यात

आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जमादार फुलचंद हजारे, पोलिस कर्मचारी प्रदीप हावाले व चालक वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अवैधरीत्या ट्रक व ट्रॅक्टरमधून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

जमादार फुलचंद हजारे, प्रदीप हावाले यांनी ३५ लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त केला. प्रकाश ऊर्फ पप्पू भगवान भालेकर (रा. आ-पेगाव) व ट्रकचालक सोमनाथ चांगदेव कोहक (रा. शेवगाव ता. शेवगाव जिल्हा अहिल्यनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

Jalna News
Jalna Fraud News : शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, आरोपींना अटक; पाच दिवस पोलिस कोठडी

कारवाई दरम्यान मनोज कल्याण नाटकर (रा. गेवराई), मंगेश ऊर्फ सोन्या पिता माउली चौधरी (रा. आपेगाव) यांच्यासह सोमनाथ चांगदेव कोहक व प्रकाश ऊर्फ पप्पू भगवान भालेकर यांच्यावरही लोडरच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केल्याच्या आरोपावरून गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या कारवाई दरम्यान ट्रॅक्टर, ट्रक, लोडर असा ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एक लोडर व कार घेऊन वाळूमाफिया पळून गेले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस सहायक पोलिस फौजदार कंटुले हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news