Grant scam: Eleven more revenue officers suspended
जालना, पुढारी वृत्तसेवा :
नैसर्गिक आपत्तीपोटी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानावर ४० कोटींचा डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आकरण्यात आली आहे. यापूर्वी १० तलाठ्यांना निलंबित करण्यात आले होते. यात गुरुवारी (दि.१९) आणखीन ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. आतापर्यंत २१ जण निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये ७ ग्राममहसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील ४ अव्वल कारकून यांचा समावेश आहे.
दरम्यान, या घोटाळ्यातील १० तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार, १३ जून रोजी सायंकाळी उशिरा तडकाफडकी निलंबित केले होते. या तलाठ्यांनी तब्बल १ कोटीहून अधिक अनुदान हडपल्याचे चौकशीत उघड झाले होते. दरम्यान, अनुदान लाटणाऱ्यांत दोषी आढळलेल्या इतर तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार आहे. यातील ११ जणांना गुरुवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निलंबनाची कारवाई केली. ३५ ग्राममहसूल अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील २६ ग्राममहसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी तब्बल ३४ कोटी ९७लाख रुपये हडपले असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले होते. दरम्यान, आतापर्यंत या घोटाळ्यातील २१ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गणेश मिसाळ, कैलास चारे, विठ्ठल गाडेकर, बालू सानप, पचन सुलाने, शिवाजी बालके, कल्याण बमनावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिनगारे, बी. आर. भुसारे.
डी. जी. कुरेवाड, सचिन बागूल, राजू शेख, एस. एस. कुलकर्णी, ज्योती खरगुले, एस. एम. जारवाल, डी. जी. चांदमारे, आर. बी. माळी, आशिष पैठणकर, सुशील जाधव, की. डी. ससाणे,