कृषी उत्पन्न बाजार समिती www.pudhari.news  File Photo
जालना

कृषी बाजार समितीत कांद्याला चांगला भाव !

१०६.५ किंटल आवक, सरासरी ८०० रुपये, आलू-टोमॅटोचे दर स्थिर; उलाढाल ७.४३ लाखांवर

पुढारी वृत्तसेवा

Good Prices for Onions at the Agricultural Market Committee!

जालना, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना (उप बाजार पेठ रामनगर, नेर, सेवली) येथे सोमवार, दि.६ रोजी शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. कांद्याच्या आवकात वाढ झाल्याने भाव चांगले राहिले. तर आलू, टमाटे यांसारख्या दैनंदिन भाज्यांच्या दरात स्थिरता कायम राहिली. एकूण बाजार उलाढालीत सुमारे ७.४३ लाख रुपयांची नोंद झाली.

आज कांद्याची १०६.५ क्विंटल आवक नोंदवली गेली. कमाल १२००, किमान ६०० तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली. शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याचे चित्र दिसले.

आलूची ९८ क्विंटल आवक झाली. कमाल १०००, किमान २०० तर सरासरी ३५० रुपये दराने व्यवहार झाला. टमाट्याची १४.७ किंटल आवक असताना सरासरी ८०० रुपये भाव राहिला. लसूण सरासरी ३५०० रुपये, मूग शेंगा : सरासरी ५००० रुपये (मर्यादित आवक), शेवगा, भोपळा, गाजर यांचे दर देखील शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले.

बाजार समितीचे सचिव भरत तनपुरे यांनी सांगितले की, 'सध्याच्या हंगामात कांदा व आ-लूची आवक वाढत आहे. पुढील काही दिवसांत भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे." शेतकऱ्यांनी सकाळीच बाजारात येऊन चांगला भाव मिळवावा, असे आवाहन समितीने केले आहे.

फळ बाजारात सफरचंद-डाळिंब आघाडीवर

सफरचंद (केरेट) च्या २७ युनिट आवकेवर कमाल ३०००, किमान ११००, सरासरी २००० रुपये भाव मिळाला. डाळिंब, चिकू, पेऊ यांच्याही दरात चांगली मागणी दिसून आली. टरबूज व खरबुजाची आवकही उल्लेखनीय होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT