जालना : तालुक्यातील नेर येथील सोन्या चांदीचे व्यापारी संतोष बळीराम बोंद्रे हे पाथरुड येथील आठवडी बाजारात विक्री करण्यासाठी साडे दहा लाख रुपयांचे सोने दुचाकीवर बॅगमधे घेउन जात असतांना त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन धडक मारुन चोरट्यांनी सोने असलेली बॅग पळवुन नेली होती.या प्रकरणी सेवली व मौजपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन जणांना ताब्यात घेउन चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.
नेर येथील सोन्या चांदीचे व्यापारी संतोष बळीराम बोंद्रे हे सोन्याचांदीचे दागीने घेउन पाथरुड येथील आठवडी बाजारासाठी दुचाकीवरुन जात असताना त्यांना बाबर पोखरी पाटीजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमानी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.त्यानंतर चाकूचा धाक दाखवून बोंद्रे यांच्या जवळीलल अंदाजे साडे दहा लाख रूपयाच्या सोने- चांदी असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
या बाबतची माहीती मिळताच सेवली तसेच मौजपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर रस्तावरील फुटेज तपासुन पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला. संशयीत आरोपींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेउन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता संशयीतांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडु सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मु्देमाल जप्त केला. चोरी झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी साडेदहा लाखाच्या सोने चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, परतूर विभागाचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खटकळ , पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख ,अंमलदार सुभाष राठोड, संतोष चव्हाण राहुल पाईक राव, तुकाराम राठोड, पांडुरंग निंबाळकर, विजय जुम्बडे, संजय उघडे, प्रल्हाद चिरफरे, अशोक दुभळकर तसेच मौजपुरी पोलीस ठाण्याचे नितीन खरात, प्रदीप पाचरणे यांनी केली.