Gold Silver Prices collapsed सोन्या-चांदीचे भाव कोसळले; बाजारात खळबळ Pudhari File Photo
जालना

सोन्या-चांदीचे भाव कोसळले; बाजारात खळबळ

लग्नसराईच्या हंगामापूर्वीच दागिने खरेदीदारांसाठी दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Gold and silver prices collapsed; causing a stir in the market

जालना, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थसंकल्प आणि जागतिक घडामोडींमुळे गत पाच दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या आणि चांदीचे दर प्रचंड घसरत चालले आहे. यामुळे लग्नसराईच्या हंगामापूर्वीच हे दर घसरत असल्याने दागिणे खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे.

दरम्यान, आज, सोमवार दि. २ रोजी देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असल्याचे पहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दर अचानक खाली आल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. जागतिक बाज ारातील बदल, डॉलर मजबूत होणे आणि गुंतवणूकदारांनी नफा काढण्यासाठी केलेली विक्री यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव आला आहे.

रविवार दि. १ रोजी विना जीएसटी चांदीचा दर लाख ६५ हजार ७५१ इतका प्रतिकिलोसाठी होता. तर सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅमसाठी विना जीएसटी १ २ लाख ४८ हजार ६९७ इतका होता. तर तोच दर जीएसटी सह चांदी २ लाख ४३ हजार ९५० तर सोने २४ कॅरेट १ लाख ४६ हजार ५३८ इतका होता.

रविवारच्या बंद भावाच्या तुलनेत सोमवार दि. २ रोजी देखील ६ हजार ४२७ रुपयांनी सोने स्वस्त झाले. तर चांदीच्या दरात देखील २९ हजार २५५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. आता सोन्याचे दर १ लाख ४६ हजार ५४० तर चांदीचे दर २ लाख ४३ हजार ५९० इतके झाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, बाजारात सध्या चढ-उतार सुरू असून ही स्थिती काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाई न करता बाजाराची दिशा पाहूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यात येतआहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT