ओबीसी आरक्षण File Photo
जालना

OBC Reservation : 'सगेसोयरे' शब्द नाही सरकारची ठाम भूमिका : छगन भुजबळ

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सगेसोयरे' शब्द नाही यावर सरकाराची ठाम भूमिका आहे. आपल्या भावनांचा सरकारने आदर केला आहे आणि गांभिर्याने हा विषय़ घेतला आहे, अशी ग्‍वाही मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.२२) दिली. लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडिगोद्री यथे ओबीसींसाठी उपोषण सुरू केलं आहे. हाके यांच्या आंदोलनाचा आज (दि.२२) दहावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ,  धनंजय मुंडे, गिरीश महाजन, उदय सामंत लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले. यावेळी भुजबळ बाेलत हाेते. ( OBC Reservation)

या वेळी भुजबळ म्‍हणाले, "आपल्या भावनांचा सरकारने आदर केला आहे. आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या. मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या. आमच्यावरचा अन्याय कधीपर्यंत सहन करायचा? गरिबांना अधिक दिलं पाहिजे, असं म्हणत निवडणुकीनंतरही ओबीसींना टार्गेट केले गेले आहे, असा आरोपही त्‍यांनी केला. (OBC Reservation)

जरांगेंना आरक्षण म्हणजे काय माहीत नाही

अजुन आमची लढाई संपलेली नाही हम किसी के बाप से डरते नहीं. आम्ही कोणालाही धमकी देत नाही.  राज्यात अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले दिले गेले. हे दाखले पुन्हा तपासले जाणार आहेत. खोटे दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार.  जरांगेंना आरक्षण म्हणजे काय माहीत नाही. असेही ते यावेळी म्‍हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT