जालना बाजार समितीत आले, लसणाची धूम  pudhari photo
जालना

Garlic Ginger Price Jalna : जालना बाजार समितीत आले, लसणाची धूम

आल्याला 7 हजार तर लसणाला 9 हजारांचा भाव

पुढारी वृत्तसेवा

जालना : स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार पेठेत आज भाजीपाला आणि फळांची मोठी आवक झाली. बाजार समितीने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आजच्या बाजारात आल्याला प्रति क्विंटल कमाल 7 हजार रुपये तर लसणाला प्रति क्विंटल तब्बल 9 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे.

या वाढत्या दरांमुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आजच्या बाजारभावानुसार फळांमध्ये आंब्याची (कॅरेट) 588 क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून त्याला किमान 400 तर कमाल 1800 रुपये दर मिळाला. सफरचंदाला 3400 रुपये, तर डाळिंबाला 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमाल भाव मिळाला.

भाजीपाल्यामध्ये हिरवी मिरचीला प्रति क्विंटल कमाल 6000 रुपये, गवार आणि शेवग्याला 4500 रुपये, तर टमाटे आणि कारल्याला प्रत्येकी 3500 रुपये कमाल भाव मिळाला. कांद्याची 656 क्विंटल आवक झाली.

लिंबाला 7500 रुपये भाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, जालना येथे मंगळवारी लिंबाची 6.8 क्विंटल आवक झाली. लिंबाला यावेळी कमाल भाव 7,500 तर किमान भाव 3,500 रुपये मिळाला. सरासरी भाव हा 4,500 रुपये इतका राहिला. याचे मूल्यांकन 30,600 इतके झाले. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे लिंबाची मागणी वाढली आहे. यामुळे लिंबाला चांगला भाव मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT