Gas Cylinder Theft Case  Pudhari
जालना

Gas Cylinder Theft | टंचाईच्या काळात रामनगर परिसरात गॅस सिलिंडर चोरी; 110 सिलिंडर लंपास

Jalna Crime | मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Jalna Gas Cylinder Theft Case

जालना : तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलिंडर चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी 14 ते 16 मार्च दरम्यान रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि भरलेले सिलिंडर लंपास केले. चोरी झालेल्या सिलिंडरमध्ये 14 किलो वजनाचे 96, 5 किलो वजनाचे 2 आणि 19 किलो वजनाचे 12 सिलिंडरांचा समावेश आहे. या सर्व सिलिंडरची एकूण किंमत सुमारे 4 लाख 51 हजार 543 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच गोडाऊनमध्ये यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची पार्श्वभूमी असताना जालन्यातही गॅस वितरणावर त्याचे पडसाद उमटत आहेत. काही ठिकाणी टंचाईची स्थिती जाणवत असून व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा आधीच बंद करण्यात आला आहे.

तथापि, घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेचा तपास पोलिसांनी हाती घेतला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT