Ganja worth 87 lakhs seized in Kauchalwadi
जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारातील गांजाच्या शेतीवर एटीएस व अंबड पोलिसांनी छापा टाकून ८७ लाख रुपयाचा गांजा जप्त केला असून या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड व अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, अंबड तालुक्यातील कौचलवाडी या गावात एका व्यक्तीने गांजाची शेती केली असून सध्या गांजाची काढणी सुरू आहे. अंबडचे सपोनि सचिन इंगेवाड, पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे, सहायक फौजदार शेख अकतर, पोलिस हवालदार विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंडे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार कौचलवाडी येथील शेत गट क्रमांक ७८७ शिवारातून जवळपास ४ क्विटल गांजाची झाडे पाला, फुले काढणी काढणी करून ती सुकविण्यात येत आहेत. तसेच काही झाडे उभी आहेत.
पोलिसांनी शेतात जाऊन मुद्देमाल जात केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, पोनि. संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि, सचिन इंगेवाड, पोउनि. भगवान नरोडे, सहाय्यक फौजदार शेख अकतर, पोलिस हवालदार विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे आदींनी केली आहे. अंबड पोलिस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजाची झाडे सुकविणे होते सुरू
कौचलवाडी येथील गट क्रमांक ७८७शिवारात ४ क्विंटल गांजाची झाडे, पाला, फुलांची काढणी करून सुकविण्यात येत होती. ही माहिती एटीस आणि अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी छापा मारून गांजा जप्त केला आहे.