Jalna News : व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद file photo
जालना

Jalna News : व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद

२ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Gang that robbed a businessman arrested

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत असलेल्या मांडवा शिवारात आशपाक बागवान या मोसंबी व्यापाऱ्यासह त्याचा मुलगा अर्शद यांना मारहाण करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील एका आरोपीचा शोध सुरू आहे.

जालना शहरालगत असलेल्या मांडवा शिवारात लाडसावंगी येथील मोसंबी व्यापारी आशपाक बागवाग या मोसंबी बाग विक्री करावयाचे असल्याचे सांगुन ती पाहण्यासाठी बोलावीत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

यावेळी आरोपींनी त्याच्याकडील रोख रक्कम, सोन्याची अंगठी व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत सहा आरोपींना अटक केली.

अटकेत घेतलेल्या आरोपींपैकी गणेश संतोष परळकर, महेश उर्फ सोनु राजु गौशिक, गणेश बाबुराव मोहिते, गणेश भावराव पाखरे ईलियास नजिरोद्दीन बागवान यांना अटक करण्यात आली आहे. ईलियास बागवान यांचा आशपाक बागवान यांच्याशी जुना वाद असल्याने या वादातुन त्यांनी गणेश परळकर व त्यांच्या टोळीस सुपारी देण्यात आल्याची माहीती पोलिस तपासात समोर आली आहे.

गणेश परळकर, गणेश मोहिते यांनी त्यांचा तिसरा साथीदार कृष्णा दिपक पैंजणे यांच्या मार्फत सदर गुन्हा केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन, दोन दुचाकी व लुटीतील रक्कम साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींविरुद्ध भा.दं. वि. कलम ३९४, ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक जण फरार

या गुन्ह्यातील एक आरोपी जितू मेहरा हा फरार असल्याचे सांगण्यात आले. पकडण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करुन पोलिस पुढील तपास करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT