Fund approved for Ahilyadevi Holkar Memorial
जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड चौफुली जवळ स्मारक समितीच्या पुढाकाराने आणि महानगर पालिका प्रशासनाच्या सहकार्यातून पाच हजार स्क्वेअरफूट जागेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लक्षवेधी स्मारक साकारले जात आहे. या स्मारकास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पावणे दोन कोटीच्या तत्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष कपिल दहेकर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक शहराच्या सौदर्यात भर घालणारे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठकीपुर्वी पुण्यश्लोक अहिल्या मातेचे ३०० व्या जयंती पर्व चालू असल्या कारणाने सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना घोंगडी व पिवळा फेटा आणि जालना शहरातील होणारे स्मारकाची प्रतिमा, स्मारक निधी मागणी पत्र सह देऊन स्मारक समितीचे अध्यक्ष कपिल दहेकर व सदस्यांनी स्वागत केले.
बैठकीस उपस्थितीत पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा. कल्याण काळे, आ. बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. हिकमद उढाण, आ. राजेश राठोड, आ. विक्रम काळे यांनी अहिल्यामातेच्या स्मारकेला निधी कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही त्या अनुषंगाने १.७५ कोटी अहिल्या मातेच्या स्मारकाला तत्वतः मंजुरी दिली.
बैठक संपल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन स्मारक कामाची पाहणी केली. तसेच वैयक्तीक २५ लाख रूपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष कपिल दहेकर, समाजबांधव उपस्थित होते.
शहराच्या वैभवात भर घालणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तयार होत आहे. या स्मारकाच्या सुसोभिकरणाच्या कामासाठी वाढीव निधी देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा नियोजन बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी वाढी निधी मंजूर केला आहे. पालकमंत्र्यांनी वैयक्तीक २५ लाखांची मदत केली आहे.कपिल दहेकर, अध्यक्ष, स्मारक समिती, जालना