घनसावंगी ः आयोजित शिबिरात रुग्णांशी संवाध साधताना आमदार हिकमत उढाण व इतर. pudhari photo
जालना

Ghansawangi health camp : गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देऊ

आयोजित शिबिरात आमदार हिकमत उढाण यांचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी ः तालुक्यातील गरिब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार हिकमत उढाण यांनी केले आहे. घनसावंगी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ते बोलत होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

या शिबिरामध्ये लहान मुलांसाठी मोफत 2 इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया तपासणी करण्यात आली. तसेच दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्युलर हात-पाय तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आमदार हिकमत उढाण म्हणाले, “हे शिबिर केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र या शिबिराच्या माध्यमातून अशा मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय उपलब्ध करून देत त्यांना नवजीवन देण्याचा प्रयत्न आहे.”

कार्यक्रमात ऑनलाईन व्हीसीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा माझा लाडका आमदार हिकमत उढाण आहे,” अशा शब्दांत त्यांनी उढाण यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

शिबिराला प्रतिसाद

या शिबिरात 147 लहान मुलांची मोफत 2 इको तपासणी करण्यात आली, तर 125 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचार व शस्त्रक्रियांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिरात 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT