North Maharashtra Heatwave Alert| उत्तर महाराष्ट्राला उष्माघाताचा विळखा

आठ रुग्णांची नोंद : नाशिक व जळगावमध्ये प्रत्येकी एक रुग्ण
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

नाशिक : राज्यात सध्या उन्हाचा सहाला प्रचंड वाढला असून, उत्तर महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा मोता फटका बसला आहे. खान्देशसह नाशिक विभाग आतापणी उष्माघाताचे आछ रुग्ण आदळले असून, यात सर्वाधिक सम्ण नंटरवार जिल्ह्यातील आहेत. नाशिकमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

राज्यांत दिवसेंदिवस वाढणान्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानाचा पारा ४० अंश सेत्लिअसपर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मार्चपासून राज्यात तापमान सातत्याने वाढत आहे. एप्रिलमधी तापमानात अधिकच जाइ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे मागील दोन महिन्यांत राज्यातील १५ जिल्ह्यांत तब्बल ३९ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोल्यात सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद झाली आहे.

या खालोखाल मंडरचार ६, रानागिरी ५. गडचिरोली, जालना, पालघर, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांत प्रत्येकी २ रुग्ण आणि गोंदिया, जळगाव, नाशिक, परभणी, पुणे, सोलापूर आणि ठाण्यात प्रत्येकी एका सत्याची नोंद झाली आहे सोलापूरमध्ये एका रुरणाचा उष्माघाताने संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता कमी होती. मात्र, एरिल महिन्यापासून तापमानात मोठी बाब झाली आहे. नाशिक जिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर जाता वातावरणात कमालीचा उष्मा कहला नाहे, नाशिकया गाता आठवडभरापासून अंश सेलिसावर स्थिरावला आहे.

१०५ केंद्रांत उष्माघात कक्ष

विल्ह्यात अचानक वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अर्लट झाली आहे. जि. प. आरोग विभागाने यापूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे उष्माघात कठ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जिल्ल्ह्यातील आरोग्य केंद्रांत उमाधान कक्ष कार्यान्वित करत तेथे खाटा राखीन ठेवण्यात आल्या आहेत. जिला परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या निर्देशानुसार विल्लहा आरोग्य अधिकारी अतिरित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्षाचा आढावा घेतला. ११३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी एक, ग्रामीण रुग्णालयात ४६, उपजिला रुग्णालात २४ तर, जिल्ला रुग्णालयात ३० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कार्यान्वित करण्यात आलेल्या उष्माघात कक्षात भरपूर औषधसाठा उपशवज्य आहे.

प्रशासनाला दिलेल्या सूचना

प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करावी. जिल्हास्तरावर उष्मषात कक्ष कार्यान्वित करावा, औषधसाठा ठेवावा. गरजेनुसार शाळांच्या वेळेत बदल करावा माध्यमांद्वारे जनजागृती संदर्भात उपरावयोजना काराची. जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली व पाण्याची सोय कराणी वैद्यकीय मदत व ओआरएस उपलब्य ठेवावे. कामगार, रोतकरी व बाहिर काम करणाऱ्यांनी सकाळी किया संध्याकाळी काम करावे.

नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

नागरिकांनी भरपूर पाणी व ओआरएस प्यावे

हलके व सैल कपडे वापरावेत

बाहेर जाताना टोपी, छत्रीचा वापर करावा,

साचलीत विश्रांती पेष्णाचा प्रयत्न करावा

ज्येष्ठ नागरिक व मुलांची काळजी घ्यावी.

दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे

मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावे

उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे.

लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात ठेवू नये.

आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा वाढत्या उष्णतेमुळे निर्जलीकरण, चक्कर येणे आणि पुरळ येण्यासारखे त्रास जाणवू शकतात त्यासात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news