Four acres of sugarcane reduced to ashes due to a short circuit; farmer suffers loss
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागून चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. दोदडगाव परिसरातील गट क्रमांक २२६ मध्ये गोरखनाथ मुंढे यांच्या शेतात ऊसाचे पीक उभे होते. दरम्यान, शेताजवळील विद्युत डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून उसाच्या शेताला आग लागली. ऊसाचे पीक सुकलेले असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पाहता पाहता मोठ्या क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत जवळपास चार एकर क्षेत्रातील ऊस जळून मोठे नुकसान झाले होते.
या घटनेमुळे शेतकरी गोरखनाथ मुंढे यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून, संबंधित विभागाने घटनेची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त वडीगोद्रीः अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे शॉर्टसींमुळे चार एकरवरील ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शासन पिकाचा पंचनामा करावा व शेतकऱ्यास नियमानुसार आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे-
देखभाल व दुरूस्ती गरजेची
दरम्यान, विद्युत डीपी व वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्यात यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या शॉर्टसर्किटमुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.