Jalna News : दुष्काळग्रस्त भागाची माजी मंत्री महादेव जानकरांकडून पाहणी file photo
जालना

Jalna News : दुष्काळग्रस्त भागाची माजी मंत्री महादेव जानकरांकडून पाहणी

अंबड : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शासनाकडे पाठपुराव्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Former Minister Mahadev Jankar inspects drought-affected areas

अंबड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी अंबड परिसरातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अत्यल्प व अनियमित पावसामुळे शेतीपिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांसमोरील विविध समस्यांची त्यांनी शेतशिवारात जाऊन माहिती घेतली.

यावेळी माजी मंत्री जानकर यांनी शेतकरी व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीची शासनाच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांना आवश्यक मदत व उपाययोजना मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पक्षाचे मुख्यसचिव माऊली सलगर, प्रदेश युवकाध्यक्ष अजित पाटील, नगरपरिषदेचे सभापती तथा रासप जिल्हाध्यक्ष सचिन खरात, नगरसेवक खुर्शीद भाई जिलानी यांच्यासह विकास साखरे, अस्लम सय्यद, झाकेर अली, भारत खरात, मुन्ना खरात उपस्थितीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT