जालन्यात बालिकेवर नराधमांकडून अत्याचार; पाच संशयित ताब्यात pudhari news
जालना

जालन्यात बालिकेवर नराधमांकडून अत्याचार; पाच संशयित ताब्यात

जालन्यात बालिकेवर नराधमांकडून अत्याचार; पाच संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

जालना : पुढारी वृत्तसेवा : जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चंदनझिरा भागात एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना रविवारी (दि.१३) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

चंदनझिरा भागातील मातोश्रीनगर भागात एक महिला आपल्या नऊ वर्षीय मुलीसोबत राहते. मोलमजुरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. नेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर मायलेकी झोपल्या होत्या. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुलीच्या आईला फोन आल्याने मुलीची आई बांधकाम कामगाराची पेटी आणण्यासाठी गेली होती. मुलगी घरात एकटी झोपलेली होती. घरी आल्यावर मुलगी घरात दिसली नसल्याने आईने आरडाओरड केली.

तसेच कॉलनीत सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली. कॉलनीतील नागरिकांनी शोध घेण्यासाठी मदत केली. कॉलनीच्या एका नाल्यात मुलगी रात्री बेशद्धावस्थेत आढळून आली. तिला नातेवाइकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांच्या मदतीने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हलविले. या मुलीवर अत्याचार करून, तिला बेदम मारहाण करण्यात आल्याने ती बेशुद्ध पडली होती, असे सांगण्यात येत आहे. मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर असून, तिला पुढील उपचारांसाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी याप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह आ. कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. चंदनझिरा पोलिस परिसरात तळ ठोकून आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT