Chain Snatching : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे पाचजण जेरबंद file photo
जालना

Chain Snatching : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे पाचजण जेरबंद

चोरीचे सोने खरेदी करणाराही लागला पोलिसांच्या गळाला

पुढारी वृत्तसेवा

Five individuals arrested for snatching gold chains from women's necks

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका जणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून ३ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक तेघवीस सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली-

जालना शहरातील संभाजीनगर भागातील वंश ब्लु बेल्स सोसायटी येथे राहणाऱ्या संगिता गोपिकिशन लोहिया व बडी सडक भागात राहणाऱ्या शंकुतला शिवकुमार राठी यांच्या गळ्यातील दीड तोळयाची सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावून नेली होती. या बाबत जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात १ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ जून रोजी महसूल कॉलनीत राहणाऱ्या उषा शरद आडणे या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. साखळी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा तपास करताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान सुमित रूपेशकर, चेतन गायकवाड, शुभम वैद्य आणि अजय गांगुर्डे या चौघांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करून चौकशी केली असता चोरीचे सोने छत्रपती संभाजीनगर येथील सराफा दुकानात काम करणाऱ्या अजय लोळगे याच्याकडे विकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील साखळी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या कारवाईत चोरीतील सोन्याचे दागिने व इतर मिळून ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रक-रणामुळे सदर बाजार पोलिस ठाण्यातील दोन आणि तालुका पोलिस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT