Father and Uncle Sentenced to Life Imprisonment for Daughter's Murder
जालना, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीच्या निघृण खूनप्रकरणी जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने वडील व चुलत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणात संतोष भाऊराव सर ोदे आणि नामदेव भाऊराव सरोदे यांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अंतर्गत तीन वर्षे कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा देण्यात आली.
पिरपिंपळगाव गाव शिवारातील भातखेडा येथे १३ डिसेंबर २०२२ रोजी संतोष सरोदे यांनी १७ वर्षीय मुलीचा खून करून तिचा अंत्यविधी परस्पर शेतात करून पुरावा नष्ट केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चंदनझिरा पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींना अटक केली. मुलीचे प्रेमसंबंध आणि त्यामुळे झालेल्या कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान जळालेली राख, हाडे, दात, आरोपींचे कपडे आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. शशांक रा. ढोकरट यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, ज्यामध्ये फिर्यादी, पंच, तसेच इतर महत्त्वाचे