जाफराबाद : शेतकऱ्याला पोलिसांनी पकडले. यामुळे मोठा अनर्थ टळला.  (छाया : मुकेश भारद्वाज.)
जालना

Jafrabad Farmer Protest : शेतकऱ्याचा तहसीलसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

अनर्थ टळला; प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍याचा शेतकऱ्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद: तालुक्‍यातील सिपोरा देऊळझरी शिवारातील शेतातील पाण्याची पाईपलाईन वारंवार फोडण्यात येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकरी दिनकर त्र्यंबक भुसारी यांनी शुक्रवार, (दि. १९) रोजी जाफराबाद तहसील कार्यालयासमोर पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सिपोरा येथील गट क्रमांक ३४६ तसेच देऊळझरी येथील गट क्रमांक ११७ मधील शेतकरी भुसारी यांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता. शेतातील पाण्याची पाईपलाईन वारंवार जाणीवपूर्वक फोडण्यात येत असून, तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

शेतकऱ्याची फोडली होती पाईपलाईन

भुसारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी काही गैरअर्जदारांनी शेतातील अवजारांचा वापर करून पाईपलाईन फोडली. तसेच पाईपलाईनमध्ये दगड व कपडे टाकून ती निकामी करण्यात आली. मागील महिनाभरापासून हा प्रकार सातत्याने घडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT