Jalna Crime News : जून महिना संपत आला तरी नद्या, तलाव अद्याप कोरडेच File Photo
जालना

Jalna Rain News : जून महिना संपत आला तरी नद्या, तलाव अद्याप कोरडेच

आन्वा : मृगाचा कोल्हा 'लबाड', आर्द्रा 'उंदीर' घेऊन येणार काय पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Even though June is over, rivers and lakes are still dry

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस खरिपाच्या बाह्य मशागतीकरिता फायद्याचा ठरला. त्याचा फायदा घेत शेतकनऱ्यांनी शेताची नांगरणी, वखरणी आटोपली. काहींनी पेरण्या करुन टाकले आहेत. शेतकऱ्यांना आता मृगसरी बरसण्याची अपेक्षा आहे. मात्र मृगातील कोल्हा चकवा देत आहे. मृग नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असून नदी, नाले, तलाव सारेच कोरडे पडले आहेत.

भोकरदन तालुक्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मृगाच्या कोल्हा वाहनने दगा झाला दिला आता आर्दा उंदीर' घेऊन येणार काय पाऊस असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. २५ मेपासून पावसाचे पहिले नक्षत्र रोहिणीला सुरुवात झाली. या नक्षत्रात पावसाची फारशी अपेक्षा नसते, परंत, या वर्षी उलटे झाले.

या कालावधीत पाऊस झाला. मात्र, पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे जात आहे. जोखीम उचलत काही शेतकरी खरीप हंगामातील पेरणी करीत आहेत. काही मात्र प्रतीक्षा करीत आहेत. पाऊस लांबल्यास पेरणी खोळंबले. २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सरुवात होत आहे. नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. आता तरी निसर्ग साथ देणार काय? असा सवाल आहे.

रोहिणी नक्षत्र संपले मृग नक्षत्रात ही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी ठप्प झाली आहे. पावसाच्या आगमनाच्या अपेक्षेने मशागतीची कामे उरकलेले शेतकरी आता आभाळाकडे डोळे लातून बसले आहेत.

जून महिना आर्ध्यावर आला असतानाही अजूनपर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही, यामळे खरीप हंगामाच्या नियोजनात अडथळे येत असून वेळेवर लागवड न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. रब्बी हंगाम संपता शेतकऱ्यांनी मशागतीची कामे नांगरणी, तण वेचणे, शेतातील कचरा जाळणे, युद्ध पातळीवर पार पाडली. काही शेतकऱ्यांनी तर बी-बियाणे ही साठवून ठेवले आहे.

तसे बधितले तर रोहिणी या नक्षत्रात कडक उन्हाळाच असतो. तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर असतो. या वर्षी रोहिणी नक्षत्राला म्हैस हे वाहन दिले होते, म्हशीच्या लक्षणांप्रमाणेच रोहिणी नक्षत्रात अर्थात उन्हाळ्याच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाची गरज असताना मृगाचा कोल्हा शेतकऱ्यांना घातक ठरत आहे. सध्या कुठल्याही ऋतुत पाऊस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अंदाज बांधण्यात येतात

पावसाचा अंदाज घेताना त्या नक्षत्रासाठी असलेल्या वाहनाला फार महत्त्व आहे. वाहनावरून पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. प्रत्येक वर्षी अंदाजानुसार वाहन बदलत असते, हे विशेष. नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस, किंवा हती असेल तर भरपूर प्रमाणात पाऊस. वाहन जर उंदीर, गाढव, मोर असेल तर मध्यम आणि जर वाहन कोल्हा किंवा मेंढा असेल तर कमी पाऊस असे अंदाज बांधण्यात येतात. जर वाहन घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT