Electricity theft : नागझरी येथे पावणेपाच लाखांची वीजचोरी उघड File Photo
जालना

Electricity theft : नागझरी येथे पावणेपाच लाखांची वीजचोरी उघड

४३ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Electricity theft worth ₹4.75 lakh uncovered at Nagzhari

जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील नागझरी गावात महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत ४३ जण वीजचोरी करताना आढळले. त्यांनी केलेल्या वीजचोरीची पावणेपाच लाख रुपयांची बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने आरोपींवर परतूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

महावितरणच्या अंबड ग्रामीण सहायक अभियंता नितीन चिंचाणे व त्यांचे सहकारी एस. बी. शाह, एस. एम. सोळंके, भाऊसाहेब मुळे, यू.टी. शेळके, आरती पांचाळ यांनी २३ मे रोजी अंबड तालुक्यातील नागझरी गावात तपासणी मोहीम राबवली.

त्यात ४३ नागरिक महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून वीज वापर करताना आढळले. या सर्वांनी महावितरणची १६ हजार ४२४ युनिट वीजचोरी केली. त्यांना वीजच- ोरीची ४ लाख ७० हजार ५११ रुपयांची निर्धारित बिले देण्यात आली. पण सर्वांनी बिले भरण्यास टाळाटाळ केली. सहायक अभियंता नितीन चिंचाणे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात ४३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT