जिल्ह्यात ईदचा सण उत्साहात file photo
जालना

जिल्ह्यात ईदचा सण उत्साहात

हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिल्या परस्परांना ईदच्या शुभेच्छा

पुढारी वृत्तसेवा

Eid celebrated with enthusiasm in the district

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात ईद सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून मशिदी व ईदगाह मैदानांकडे मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

शहरातील मोती तलाव परिसरातील ईदगाह मैदानावर मुख्य नमाज अदा करण्यात आली. या वेळी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शांतता, बंधुता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. नमाजानंतर एकमेकांना आलिंगन देत "ईद मुबारक" च्या शुभेच्छा देण्याचा आनंददायी दृश्य सर्वत्र पहायला मिळाले.

या प्रसंगी महापौर वंदना मगरे, खा. कल्याण काळे, महापालिकेचे उपमहापौर राजेश राऊत, यांच्यासह विविध पक्षांचे नेत्यांसह पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या वेळी हिंद बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण केला. सर्व धर्मीयांनी एकत्र येत सण साजरा केल्याने "सर्वधर्म समभाव "चा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. जालना जिल्ह्यात ईद सण उत्साह, आनंद आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडल्याचे चित्र दिसून आले.

शांततेचे केले होते आवाहन

जिल्हाभरातही विविध ठिकाणी ईद उत्साहात साजरी झाली असून बाजार-पेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. प्रशासनानेही नागरिकांना शांततेत व आनंदात सण साजरा करण्याचे आवाहन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT