Jalna News : भाव नसल्याने फुलकोबीच्या उभ्या पिकात सोडली जनावरे file photo
जालना

Jalna News : भाव नसल्याने फुलकोबीच्या उभ्या पिकात सोडली जनावरे

१ ते २ रुपये किलोचे भाव, हिसोडा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Due to a lack of fair prices, cattle were let loose into the standing cauliflower crop

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी हिसोडा येथे शेतकऱ्याने पिकवीलेल्या फुलकोबीला बाजारात केवळ १ ते २ रुपये किलो भाव मिळत असल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांने उभ्या पिकात जनावरे सोडल्याचे पहावयास मिळाले.

हिसोडा येथील रामेश्वर जगताप या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर फुलगोबीची लागवड केली होती. बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि पाणी यासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च आला. दुष्काळातही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने फुलगोबीचे गड्डे चांगले पोसले.

मात्र काढणीच्या वेळी बाजारात फुलगोबीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर प्रचंड कोसळले. फुलगोबीला अवघा १ ते ३ रुपये किलो भाव मिळत असतांनाच त्यातुन वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतातून माल बाजारात नेणेही परवडत नसल्याने शेतकऱ्याने उभ्या फुलकोबीच्या पिकात जनावरे सोडली.

फुलकोबीला भाव नसल्याने खर्चही निघत नाही. यामुळे बैल, गायी आदी जनावरे सोडून जनावरांना फुलकोबी खाण्यासाठी ठेवली.
- रामेश्वर जगताप, शेतकरी हिसोडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT