Jalna Drought : चारा नाही; शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ ! file photo
जालना

Jalna Drought : चारा नाही; शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ !

घनसावंगी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Drought in Jalna: There is no fodder; farmers are now forced to sell their livestock

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः यंदाच्या पावसाने पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यात शेतीबरोबरच पशुधनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतातील पिके पावसाअभावी हातची गेली, तर दुसरीकडे जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा संपत आला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठीही शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जनावरांचे पालनपोषण करायचे तरी कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना चारा-पाणी देणेही कठीण झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे.

यंदा पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने तालुक्यातील नदी, नाले, ओढे, पाझर तलाव आणि लघुतलाव कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने पिकांचे नुकसान झालेच; मात्र त्याचा थेट परिणाम पशुधनाच्या संगोपनावर झाला आहे. जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी वाळलेल्या चाऱ्यावर कसाब-उदरनिर्वाह करीत आहेत. आ साठवलेला चारा संपत असल्याने पुढी दिवस कसे काढायचे, याची चिंता त्यां सतावत आहे.

चारा पाण्याचा खर्च करणे अवघड

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते. गाय, म्हैस, बैल, शेळ्या यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. मात्र, यंदा शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळली असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा खर्च पेलणेही अशक्य होत आहे. चारा विकत घेण्यासाठी पैसे नाहीत आणि पाण्याची उपलब्धताही नाही. त्यामुळे नाइलाजाने जनावरे विक्रीसाठी बाजारात आणण्याची वेळ पशुपालकांवर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT