Drizzles brought life to the crops; farmers await heavy rains
डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिप हंगामाती पिकांना जीवनदान मिळाले आहे. शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मक्का, भुईमूग व भाजीपाला रिमझिम पावसावर आले आहे. मागील पंधरा दिवसात पावसाने उघड दिल्याने पिके सुकू लागली होती. परंतू मागील दोन दिवसापासून डोणगाव शिवारात रिमझिम पावसाला सुरूवात झाल्याने खरिप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.
शेतकऱ्यानी अंतर्गत मशागत करून रासायनिक खते, औषध फवारणी, वखरणी, खुरपणी आदी शेती कामे आटोक्यात आणली आहे. सध्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. अर्ध्यापही विहिरीना मुबलक पाणी आलेले शिवाय नदी-नाले कोरडेठाक पडलेले दिसून येत आहे. यावर्षी सुरूवातीपासून रिमझिम पाऊस असल्याने पीक बहरलेली दिसून येत आहे.