money  pudhari file photo
जालना

Jalna district crop loan disbursement update- जिल्ह्यात शेतकऱ्यांना केवळ ४१ टक्के पीक कर्ज वाटप

खरीप व रब्बीचे १८२० कोटींचे उद्दिष्ट, ७४४ कोटी रुपयांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

जालना - जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाची उदासीनता समोर येत आहे. खरीप हंगामात १ हजार ३०३ तर रब्बी हंगामात ५१६ कोटी असे दोन्ही मिळून १८२० कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १६ नोव्हेंबरपर्यंत बँकानी केवळ ७४४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्जाचे वाटप कमी होण्यासाठी दुष्काळासह बँकाची उदासीनताही कारणीभूत ठरत असल्याचे ऐकावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बँक अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात येउन पीक कर्ज वाटपाचा पाठपुरावा घेण्यात येत होता. मात्र, तरीही बँका शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी करताना १८२० कोटींच्या उद्दिष्टांच्या अर्धा पल्लाही गाठू शकल्या नाहीत. बँकाना खरीप हंगामात पीक कर्जाचे १ हजार ३०३ कोटी रुपयांचे तर रब्बीसाठी ५१६.९३ कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते.

खरिपात बँकानी ५२०.३४ कोटीचे पीक कर्ज वाटप केले. त्याची टक्केवारी ३९.९३ टक्के आहे. रब्बी हंगामासाठी २२४.२१ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्याची टक्केवारी ४३.३७ टक्के एवढी आहे. बँकांना पीक कर्जवाटपात खरीप व रब्बी मिळून दिलेल्या १८२० कोटींच्या पीक कर्ज वाटपापैकी केवळ ७४४ कोटीचे पीक कर्ज वाटप करता आले. बँकाना किमान ५० टक्के देखील उद्दिष्ट पूर्ण करता आत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात बँकांची पीक क वाटपाची कार्यवाही गरजे पेक्षा संब असल्याचे चित्र आहे. १६ नोव्हेंबरच्य अहवालात दोन्ही हंगामांसाठ जिल्ह्यातील ८८ हजार ५२ शेतकऱ्यांना ७४४ कोटी ५५ लार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यान आले आहे. त्याची टक्केवारी ४०.९ टक्के एवढी आहे.

यामध्ये खरी हंगामात ७९ हजार २६२ शेतकऱ्यांन ५२० कोटी ३४ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले तर रब्बी हंगामान ९ हजार २६७ शेतकऱ्यांना २२४ कोट २१ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्या आले आहे. कर्जवाटपाची प्रक्रिय अजूनही सुरूच असल्याने हा आकड थोडा फार वाढण्याची शक्यता आहे.

वाटपावर परिणाम

अनेक शेतकऱ्यांनी ई - केवायसी तसेच फार्मर आयडी केलेली नसल्याने त्यांना पीक कर्ज वाटपात अडचणी येत आहे. दुष्काळामुळे पावसाअभावी अनेक भागात रब्बीच्या पेरण्या न झाल्याने त्याचाही परिणाम पीक कर्ज वाटपावर झाल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT