Diesel Theft : मध्यप्रदेशातून येऊन समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी  File Photo
जालना

Diesel Theft : मध्यप्रदेशातून येऊन समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी

तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हा शाखेने केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Diesel theft on Samriddhi Highway from Madhya Pradesh

जालना, पुढारी वृत्तसेवाः मध्यप्रदेशातुन येउन जालना तालुक्यातील गुंडेवाडी शिवारातुन जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर ट्रक चालकांना तलवारीचा धाक दाखवुन डिझेल चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केले. या कारवाईत मध्यप्रदेशातुन आलेल्या तीन आरोपींना एका लॉजमधुन जेरबंद करण्यात आले.

जालना जिल्ह्यातुन जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर गेल्या काही दिवसापासुन ट्रक चालकांच्या ट्रकमधुन डिझेल चोरीचे अनेक गुन्हे घडत असल्याने पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस पथकास शोध घेण्याचे सांगीतले होते. त्याअनुषंगाने पथक डिझेल चोरी करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेत असतांना पथकास शहरातील अंबड रोडवरील लक्ष्मीकांत नगर भागातील श्री हॉटेल येथे डिझेल चोरी करणारे तीन संशयित थांबले असल्याची माहीती खबऱ्याने दिली.

पथकास पोलिसांनी त्याठिकाणी जावुन संशयीत समीर नूर मोहम्मद मेव (रा.दोपाडा, जि. शाजापुर, राज्य मध्यप्रदेश), हनिफ खान मुंशी खान (रा. दोपाडा, जि. शाजापुर, राज्य मध्यप्रदेश) हुसैन खान अजिज खान (रा. सुजानपुर, जि. शाजापुर, राज्य मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जालन्यातील दोन साथीदारांसोबत मिळून ३० जुलै रोजी सकाळी ०४:३० वाजेच्या सुमारास समृध्दी महामार्गावरील गुंडेवाडी पेट्रोलपंपाजवळ ट्रक चालकास तलवारीचा धाक दाखवुन ट्रकमधुन १०० लिटर डिझेल चोरी केल्याचे सांगितले.

या प्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यात यापुर्वीच गुन्हा दाखल असुन पोलिसांनी मुद्देमालही जप्त केला आहे. सदर टोळीने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ०१:०० वाजेच्या सुमारास समृध्दी महामार्गावर एका कंटेनर ट्रकमधुन ७० लिटर डिझेल चोरी केल्याची कबुलीही पोलिसांना दिली. या प्रकरणातही सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातुन ३१०० रुपयांचे तीन मोबाईल जप्त केले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, अमंलदार भाऊराव गायके, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, अशोक जाधवर यांनी केली आहे.

या आरोपींकडुन डिझेल चोरीसह इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत असल्याची माहीती सुत्रांनी दिली.

डिझेल चोरीसाठी चारचाकी वाहनांचा वापर

जालना शहरातुन गेलेल्या समृध्दी महामार्गावर गेल्या काही दिवसापासुन ट्रक चालकांच्या डिझेलच्या चोरी होण्याच्या घटनांमधे मोठी वाढ झाली आहे.

चार चाकीमधे चोरीच्या डिझेलच्या कॅन टाकुन चोरटे डिझेल चोरी करीत असल्याने ट्रक चालाकांसाठी समृध्दी महामार्ग अडचणीचा ठरत आहे.

ट्रक चालक हैराण

डिझेल चोरी करणारे रॅकेट जालना जिल्ह्यात कार्यरत असुन आता परप्रांतीय आरोपींचाही त्यात सहभाग वाढल्याने डिझेल चोरी ही परप्रांतातुन आलेल्या ट्रकचालकासाठी डोकेदुखी बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT