Jalna News : ७ लाख ४४ हजार बालकांना दिल्या जाणार जंतनाशक गोळ्या file photo
जालना

Jalna News : ७ लाख ४४ हजार बालकांना दिल्या जाणार जंतनाशक गोळ्या

शहरी भागातील २,३७,०३९ व मनपा जालना येथील ७४ हजार ६५३ बालकांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Deworming tablets to be given to 7 lakh 44 thousand children

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या दिवशी गोळ्या घेता न आलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ० ते १९ वर्षे वयोगटातील ४ लाख ३२ हजार ७३८ ग्रामीण भागातील बालकांना, तर शहरी भागातील २ लाख ३७ हजार ३९ व मनपा जालना येथील ७४ हजार ६५३ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात एकूण ७ लाख ४४ हजार ४२६ बालकांना गोळ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरातील जंतांमुळे रक्तक्षय, कुपोषण आणि शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वयानुसार जंतनाशक गोळ्या देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

या मोहिमेचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी ताई यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जंतनाशक गोळ्या देण्याबाबत सहकार्य करावे सतत पोटदुखी किंवा पोटात कळा येणे. भूक मंदावणे किंवा वजन कमी होणे. ही लक्षणे जंताची अशू शकतात. यामुळे पालकांनी १ ते १९ वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत सहकार्य करावे. यामुळे मुलांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळेल.
- डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. जालना.

४०८४ मनुष्यबळाच्या माध्यमातून मोहीम

जालना जिल्ह्यातील ४ हजार ८४ मनुष्यबळाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी ताई, आशा ताई यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. १ ते १९ वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यासाठी प्रेरित करावे. यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील पालकांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT