Jalna News : पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे तत्त्वतः मंजुरीचे आश्वासन; आ. खोतकरांच्या पाठपुराव्याला यश file photo
जालना

Jalna News : पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे तत्त्वतः मंजुरीचे आश्वासन; आ. खोतकरांच्या पाठपुराव्याला यश

शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या आग्रही पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Deputy Chief Minister Shinde's assurance of in-principle approval of water supply scheme; come Success in pursuit of Khotkars

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या आग्रही पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून प्रस्तावित १,२४६ कोटी रुपयांच्या स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वतः मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे.

नुकत्याच मौजपुरी (ता. जालना) येथील दौऱ्यादरम्यान आ. खोतकर यांनी हा गंभीर प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्याची तत्काळ दखल घेत शिंदे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आ. खोतकर यांनी पत्र देऊन उपमुख्यमंत्री शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक बोलविण्याची मागणी केली आहे.

सन २०६० पर्यंत शहराची अंदाजित ७.७३ लाख लोकसंख्या गृहीत धरून या योजनेत स्वतंत्र मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण प्रकल्प, टाक्या आणि आधुनिक पंपिंग यंत्रणेचा समावेश असेल. या पाणीपुरवठा योजनेमुळे जालनेकरांची पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.

ही योजना अंबडमार्गे न आणता जालन्यासाठी स्वतंत्रपणे राबविण्यात येईल. मौजपुरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेला तत्त्वतः मंजुरीचे आश्वासन देत तातडीने बैठकीचे निर्देश दिले आहेत. प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील. जालनेकरांना नियमित आणि शाश्वत पाणीपुरवठा देणे, हाच आमचा संकल्प आहे.
आ. अर्जुनराव खोतकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT