जालना ः शहराच्या वळण रस्त्यावर ग्रामीण भागातून इस्पितळातील रुग्ण, शासकीय कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधांसाठी तातडीने सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष विजय वाढेकर यांनी केली आहे.
या संदर्भात पालकमंत्री पंकजाताई मुंढे,आ. अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी, राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, रिंग रोड परिसरात औद्योगिक वसाहत, कृषी उत्पन्न बाजार समिती, शासकीय, खासगी रुग्णालये, जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक ,जिल्हा परिषद व पंचायत समिती अशी महत्त्वाची कार्यालये, न्यायालय असल्याने दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र सार्वजनिक बस सेवा नसल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सिटी बस सेवा सुरू झाल्यास ग्रामीण व शहरी नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल, तसेच वाहतूक कोंडी कमी होईल असे नमूद करत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विजय वाढेकर यांनी केली.
निवेदनावर प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश प्रवक्ते डॉ सुदर्शन तारख. विभागीय कार्याध्यक्ष विजय वाढेकर, जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड , उपाध्यक्ष ज्ञानदेव जगताप, जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे,जिल्हा संघटक आशिष अग्रवाल, सुवर्णा राऊत, दीपाली दाभाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.