Crime News : राजमहेल टॉकीज भागात युवकाचा खून Pudhari File Photo
जालना

Crime News : राजमहेल टॉकीज भागात युवकाचा खून

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Youth murdered in Rajmahal Talkies area

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील राजमहल टॉकीज परिसरात रविवारी सकाळी एका 38 वर्षीय युवकाचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शेख रफिक शेख कासम (वय 38, रा. टट्टूपुरा, जालना) असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास राजमहल टॉकीजजवळ एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली.

याबाबत पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून पंचनामा व प्राथमिक तपासाची प्रक्रिया सुरू केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून, खुनामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन ते तीन विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

दरम्यान, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे राजमहल टॉकीज, पंचमुखी महादेव मंदिर परिसर तसेच आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासाच्या पुढील टप्प्यात खुनामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी

जालना शहरात रविवारी सकाळी झालेल्याच. शेख रफिक शेख कासम याच्याक खुन प्रकरणात आरोपींच्यात शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केल्याची माहीती सुत्रांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहीती गोळा केल्यााचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT